घाव अजुनी...

रविवार, १० जानेवारी, २०१०

या जातींचं करायचं काय?

जग दिवसंदिवस सुशिक्षित होत चालले आहे. या सुशिक्षितपणाबरोबरच माणसांच्या डोक्याचे होत असलेले यांत्रिकीकरण हा ही एक कळीचा मुद्दा आहे. माणसात येत असलेल्या या यंत्रवतपणामुळे संवेदनशीलता ही नावालाच शिल्लक उरली आहे. उरलेली ही संवेदनशीलता ही मनात निबरपणाच्या कित्येक थरांखाली दडून बसलेली आहे. जून्या गोष्टी बदलत चालल्या आहेत. पण सर्वथा टाकून द्यावी असावी जात ही काही कुणाला सोडाविशी वाटत नाही. या जातीला प्रत्येक मनातून व समाजातून हद्दपार करण्याचे आजवर असंख्य प्रयत्न झाले. पण जी जात नाही ती जात अशी जातीची व्याख्याच काहींनी करून टाकली आहे.
 या लेखाचे शीर्षक वाचल्याबरोबरच बहूतेकांच्या (आशावादी विचासरणीमुळे सर्वांच्या असे टाईपवत नाही.) मनात आपली जात आली असेल. ही जात संकल्पना गोंजारून समाजात निर्माण होणा-या निरर्थक भींती आपणाला पाडायच्या असतील तर प्रत्येकाने आपली जातीनिहाय ओळख सोडायला हवी ( समाजात डॉक्टर आणि इंजिनीयर असा वेगवेगळा दर्जा असलेली माणसे असतील तर त्यांच्यातली भींत ही निरर्थक म्हणता येणार नाही. परंतु एक अ जातीचा डॉक्टर आणि दूसरा ब जातीचा डॉक्टर यांच्यात असणारी भींत ही बाष्कळच ठरते. म्हणून याच प्रकारच्या निरर्थक भींती किंवा भयंकर, विवेकहिन व असंस्कृत अर्थ असणा-या अशा भींती आपण पाडायला नको का?) तर सर्वच सुशिक्षित आणि त्याहूनही स्वतःला विवेकी म्हणवणारे आपली जातीनिहाय मिळणारी ओळख टाळायला तयार आहेत का? दूर्देवाने असे लोक भेटतच नाही. स्वतःला जातपात न माननारे दर्शवतांना स्वतःची जात दाखवून देणा-या अशा धूरीणांची नालस्ती करून त्यांचा जातीवंतपणा त्यांना दाखवून द्यायला हवा व खुल्या मनाने जातींना प्रभावहीन करण्याच्या चळवळीत येण्याचे निमंत्रण द्यायला हवे.जाती दाखवून देण्याचे काही नमूनेदार प्रकार (माझ्या माहितीतले) खाली देत आहे. यात वाचक भर टाकू शकतील. ही अशी वागणूक का? असा प्रश्न खालील वर्तन करणा-यांना विचारायला हवा. जातीचा अभिमान हे एक उत्तर त्याला बहूतांशी येण्याची शक्यता आहे. तो आपण आपल्या पूर्वजांचा अभिमान म्हणून दर्शवू शकत नाही काय? ही जात कशाला? असो. तर नमुने पहा.१. नविन माणूस भेटल्यानंतर त्याची जात जोखणारे काही प्रश्न विचारले जातात.कुठल्या गावचे आपण?, आपले आडनाव काय? (प्रत्येक वेळी वरील उद्देश नसतो.)२. मराठा लोकांची जात दाखवण्याची पद्धत.आडनाव सांगतांना पाटील लाऊन सांगतील. वाहनावर जयशिवाजी, द ग्रेट मराठा, राजे तुम्ही पून्हा जन्म घ्या, छत्रपती अशी अक्षरे लिहून घेतील. (असे सांगतांना प्रत्येकवेळी जात दाखवण्याचाच उद्देश), नमस्काराऐवजी रामराम करतील (प्रत्येक वेळी वरील उद्देश नसतो.)३. ब्राह्मण लोकांची जात दाखवण्याची पध्दत.साठे, मुळे, शेटे ही आडनावे साठये, मुळये, शेटये अशी लिहितील. मध्यंतरी ब्राह्मणांनी जात लपविण्यासाठी गावाचे नाव आडनावात वापरणे सुरू केले होते. उदा. मंगरूळकर, सिर्सीकर इ. पण आता आडनावात गावाचे नाव वापरण्याची पद्धत ही ब्राह्मण आहोत हे दाखवण्यासाठी किंवा आहे ती जात लपवण्यासाठी वापरली जाते. (असे सांगतांना प्रत्येकवेळी जात दाखवण्याचाच उद्देश) स्वामी समर्थ, समर्थ रामदास, सावरकर यांचे उपासक वा समर्थक आहोत हे मुद्दामहून दर्शवतील. घरावर , वाहनावर पेशवा, रघूवंश, आर्यवंश असे लिहीतील. (प्रत्येक वेळी वरील उद्देश नसतो.)४.सोनार लोक देवा तुझा मी सोनार असे वाहनावर लिहून घेतात. घरावर नरहरी कृपा असे लिहीतात.५.चांभार लोक संत रविदासांची उपासना दर्शवतात. वाहनावर असे नाव लिहून घेतात.६.नवबौद्ध लोक जयभीम असे अभिवादन करतात.या सर्व प्रकारात ब्राह्मण आणि मराठा यांना पराकोटीचा जातीचा अभिमान असल्याचे बहूतांशी आढळून येते. या जातींमधले मोठमोठे विचारवंतही आपली जात दाखवण्याच्या प्रकारापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. जातीत अभिमान बाळगण्यासारखे तसे काहीच नाही. मूळात जात ही संकल्पना गोंजारणेच चुकीचे आहे. आपला दर्जा आपल्या कार्यावरून जोखायला हवा, अभिमान आपल्या सर्वच पूर्वजांचा बाळगायला हवा. असा अभिमान बाळगतांना पूर्वजांच्या कार्याची विवेकी मिमांसाही करायला हवी. सर्वांनी जात या संकल्पनेला मुठमाती देण्याचा संकल्प करून हा उद्देश तडीस नेण्यासाठी अजून काय करता येण्यासारखे आहे यावर विचार करायला हवा.

3 comments:

हेरंब म्हणाले...

एकदम म्हणजे एकदम मान्य..मी पण यावर २-३ पोस्ट्स टाकले आहेत.
http://abhijitvaidya.blogspot.com/2010/01/blog-post_10.html

http://harkatnai.blogspot.com/2009/10/whats-your-jaatee.html

http://harkatnai.blogspot.com/2009/11/whats-your-jaatee-part-ii.html

साधक म्हणाले...

जातीव्यवस्थेत काही चुकीच्या गोष्टी आहेत म्हणुन सर्व जातीच विसरुन जा असं म्हणणं किती योग्य आहे?
जो पर्यंत ते एक मेकांचा तिरस्कार करत नाहीत त्यांना त्यांच्या सांस्कृत वारशाचे जतन करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे. जात व्यवस्था चूक होती म्हणून तुम्हि तुमचे रिती रिवाज विसरुन जा, सणवार तुमच्या पद्धतीने करु नका असं म्हणायचंय का तुम्हाला? जात सोडा म्हणजे काय? राहिली गोष्ट दिखाव्याची. त्यांना खरोखरीच अभिमान असेल त्या गोष्टींचा तर तुम्ही छातीठोक पणे सांगु शकत नाही के जात दाखवण्यासाठी असं करत आहेत. क.लो.अ.

प्रकाश बा. पिंपळे म्हणाले...

barobrach ahe. mi hi adhi mhnaje thodasa kalayal lagala tenva mhanje 10 wi zalyavar jaticha agadi far abhiman balgaycho. ti sangaycho hi ani olkhaycho hi. jast karat navhto pan baryapaiki. jatiwadi visheshan lawanyitapat hota swabhav. pan kunacha dwesh kunitari amakya jaticha ahe mhanun kela nahi. tya baddal mi ajun khup anandat ahe. nast zalela paschatap ajun gela nasta. pan khrach mala jat kalali kadhi 10 zalyavar karan ty adhi pahila tar agadi mai sarva jatiay ani dharmiya gharat lilaya firlo, swayampak gharapasun te agadi sagala sagala.mag punha kahi loka bhetali ji apaapal bhagaychi, to aapal to yancha karayachi. malch tyach wait wataycha. mi hi suru kele kamit kami aapale olkhane tari. natar navamage jat disel ashi visheshane lawali. :-) [rajakrant pravesh karnyache he ek swapna hote mhnaun hi... pan natar te wirale!] hmmmmm. pan punha changli loka bhetat geli khup chngali mazya jatitalya peksha suddha chngali. tenva kalala arere barch wel pan waya ghalawala! jat manus baghto ani tichi features tharawato ti apan jyana pahila ahe tyanchyawarun. hech chukate jag far mothe ahe, ani aapale anubhav farach turalak! pan kal badaltoy... kharach badaltoy...! hy avar wishawas thevat rahu. jyana kalat nahi tyan samjawut. artik unnati ani samjik jan nirmiti hya don margane jati nirmulan ani samanetevar adarit sampanna samajache udistya lamb nahi.
ha lekh lihalybadal dhanywad!