घाव अजुनी...

रविवार, ११ नोव्हेंबर, २०१२

इनस्क्रीप्ट शिका आणि प्रमाणित पद्धतीने मराठी टाईप करा... अगदी सहज.

इनस्क्रीप्ट या सर्वदूर उपलब्ध असलेल्या वैश्विक व प्रमाणित (युनिवर्सल स्टैंडर्ड ) पद्धतीने मराठी (देवनागरी) टंकलेखन करण्याची सहज सुलभ पद्धत.

Windows XP साठी.

सर्वप्रथम http://www.omicronlab.com/tools/icomplex-full.html येथून I complex 3.0.0 हे छोटेसे सॉफ्टवेअर सेट-अप संगणकाच्या हार्डिस्कवर उतरवून घ्या व नंतरच्या सुचनांप्रमाणे इन्स्टॉल करा.

त्यानंतर खालीप्रमाणे सेटींग करा.
















नंतर तुमच्या स्क्रीनवर उजव्या कोप-यात खालच्या बाजूस  दिसणा-या EN  या अक्षरांवर क्लिक केल्यावर खालीलप्रमाणे पॉप अप दिसेल.


















येथे मराठी सिलेक्ट करा आणि खालील की-बोर्ड लेआउट प्रमाणे कुठल्याही वेबसाईटवर मराठी (देवनागरी) टाईप करा.












(जर एखाद्या वेबसाईटवर आधीच देवनागरी टाईप करण्याची सुविधा उपलब्ध असेल व तुम्ही तुमच्या संगणकावरचे इन्क्रिप्ट वापरून टाईप करू इच्छित असाल तर संबंधित वेबसाईटवर इंग्रजी टंकलेखनाचा पर्याय तसाच ठेऊन तुमच्या संगणकावर मराठी सिलेक्ट करून टाईप करा.)

http://ildc.in/Marathi/tools/15.htm या लिंक वरून मराठी/इंग्रजी टायपिंग शिक्षक (टयूटर) डाउनलोड करून तुम्ही काही तासात मराठी (देवनागरी) टायपिंग शिकू शकता. वर सरावाने त्यात प्राविण्य मिळवू शकता.

http://ildc.in/Marathi/mdownload2000.html  येथे मराठी भाषेसंबंधित विविध संगणक प्रोग्राम आहेत.