गुरुवार, ३० ऑक्टोबर, २०१४
रविवार, ११ नोव्हेंबर, २०१२
इनस्क्रीप्ट शिका आणि प्रमाणित पद्धतीने मराठी टाईप करा... अगदी सहज.
इनस्क्रीप्ट या सर्वदूर उपलब्ध असलेल्या वैश्विक व प्रमाणित (युनिवर्सल स्टैंडर्ड ) पद्धतीने मराठी (देवनागरी) टंकलेखन करण्याची सहज सुलभ पद्धत.
नंतर तुमच्या स्क्रीनवर उजव्या कोप-यात खालच्या बाजूस दिसणा-या EN या अक्षरांवर क्लिक केल्यावर खालीलप्रमाणे पॉप अप दिसेल.
येथे मराठी सिलेक्ट करा आणि खालील की-बोर्ड लेआउट प्रमाणे कुठल्याही वेबसाईटवर मराठी (देवनागरी) टाईप करा.
(जर एखाद्या वेबसाईटवर आधीच देवनागरी टाईप करण्याची सुविधा उपलब्ध असेल व तुम्ही तुमच्या संगणकावरचे इन्क्रिप्ट वापरून टाईप करू इच्छित असाल तर संबंधित वेबसाईटवर इंग्रजी टंकलेखनाचा पर्याय तसाच ठेऊन तुमच्या संगणकावर मराठी सिलेक्ट करून टाईप करा.)
http://ildc.in/Marathi/tools/15.htm या लिंक वरून मराठी/इंग्रजी टायपिंग शिक्षक (टयूटर) डाउनलोड करून तुम्ही काही तासात मराठी (देवनागरी) टायपिंग शिकू शकता. वर सरावाने त्यात प्राविण्य मिळवू शकता.
http://ildc.in/Marathi/mdownload2000.html येथे मराठी भाषेसंबंधित विविध संगणक प्रोग्राम आहेत.
Windows XP साठी.
सर्वप्रथम http://www.omicronlab.com/tools/icomplex-full.html येथून I complex 3.0.0 हे छोटेसे सॉफ्टवेअर सेट-अप संगणकाच्या हार्डिस्कवर उतरवून घ्या व नंतरच्या सुचनांप्रमाणे इन्स्टॉल करा.
त्यानंतर खालीप्रमाणे सेटींग करा.
नंतर तुमच्या स्क्रीनवर उजव्या कोप-यात खालच्या बाजूस दिसणा-या EN या अक्षरांवर क्लिक केल्यावर खालीलप्रमाणे पॉप अप दिसेल.
येथे मराठी सिलेक्ट करा आणि खालील की-बोर्ड लेआउट प्रमाणे कुठल्याही वेबसाईटवर मराठी (देवनागरी) टाईप करा.
(जर एखाद्या वेबसाईटवर आधीच देवनागरी टाईप करण्याची सुविधा उपलब्ध असेल व तुम्ही तुमच्या संगणकावरचे इन्क्रिप्ट वापरून टाईप करू इच्छित असाल तर संबंधित वेबसाईटवर इंग्रजी टंकलेखनाचा पर्याय तसाच ठेऊन तुमच्या संगणकावर मराठी सिलेक्ट करून टाईप करा.)
http://ildc.in/Marathi/tools/15.htm या लिंक वरून मराठी/इंग्रजी टायपिंग शिक्षक (टयूटर) डाउनलोड करून तुम्ही काही तासात मराठी (देवनागरी) टायपिंग शिकू शकता. वर सरावाने त्यात प्राविण्य मिळवू शकता.
http://ildc.in/Marathi/mdownload2000.html येथे मराठी भाषेसंबंधित विविध संगणक प्रोग्राम आहेत.
Labels:
इनस्क्रिप्ट,
देवनागरी,
भाषा,
मराठी टंकलेखन,
मराठी टायपिंग,
युनिकोड
रविवार, २ सप्टेंबर, २०१२
पुण्यात मुंढवा रोडवरील ' हॉटेल रिव्हर व्ह्यू ' मध्ये झालेल्या चिल्लर पार्टीच्या संदर्भात....
शाळेत असतांना सुटी असली की आईवडीलांना पत्ता लागू न देता मित्रांसोबत दूर रानात भटकायला जायचो. कधी कधी शाळा चुकवूनही हे उद्योग केल्याचे आठवते. यात एक धाडस वाटायचे. (पण तेव्हा आईवडीलांच्या धाकापूढे ह्या धाडसाची लगेच वाफ व्हाययी.) या भटकण्यात जिज्ञासा शमवणा-य़ा नको त्या (?) उद्योगांपासून उधाणणा-या ओढ्यात पोहायचा प्रयत्न करणे, आंब्याच्या झाडावर जीवघेण्या उंचीपर्यंत जाऊन आंब्याचा उरलासुरला पाड शोधणे... क्वचित बिड्या फुंकणे असले उद्योग करायचो...( या पैकी काही उद्योगांमधली थोडीशी ही चुक आम्हा भावंडांची संख्या एक ने कमी करायला पूरेशी होती... पण तेव्हा ते कुठे कळत होते.) आज त्याचे स्वतःलाच कौतुक वाटते. पण यापोटी पाठ शेकायची वेळ येईपर्यंत मारही खाल्लेला आहे.. तेव्हा फार पाचव्या सहाव्या वर्गात असेन....... आज काळाच्या संदर्भात तेव्हा ते तितकेच गंभीर असावे आणि आजचे तितकेच क्षुल्लक असे वाटते.... बाकी तावातावाने पोराबाळांच्या काळजीतून लिहीणे हा जनरेशन ग्याप म्हणावा का... (तरीही आज तालुक्याच्या गावी असला प्रकार निदान शाळेतल्या मुलांच्या बाबतीत तरी होत नाही हे ही नमुद करायला हवे...)
***
***
गुरुवार, ७ जून, २०१२
मुलगी हवी पण....
भारतात स्रीभ्रूण हत्या वगैरे या विषयावर बरीच लोक अतिशय संवेदनशीलतेने मते मांडत आहेत. पण ही मुलगी शेजा-याच्या घरात हवी आपल्या नव्हे याकडेच बहूतेकांचा कल असतो.
माझ्या या मताशी असहमत असलेले लोक
१. ज्यांना अजून मूलबाळ झालेले नाही. (नवविवाहित)
२. जे या भूमिकेतून (मूल जन्माला घालण्याच्या) बाहेर पडलेले आहेत.
३. ज्यांना आधीच एक मुलगा झालेला आहे व अजून मुल हवे आहे.
बाकी ज्यांना आधीच एक मुलगी झालेली आहे त्यापैकी एकाचे हे मत पूरेसे प्रातिनिधीक ठरते.
"आम्ही समाजाला एक मुलगी दिली आहे मग आता आम्ही मुलाची अपेक्षा केलेली काय वाईट? मुला-मुलींचा रेशो संभाळायचा ठेका काय आम्हीच घेतला आहे का?"
गर्भलिंगचाचणी साठी येणा-या महिलेच्या सोबत तिची लाडकी मुलगी हमखास असते...
आता बोला.
(या सर्वातून भ्रुणहत्येच्या कुप्रथेचे समर्थन करणे हा उद्देश अजिबात नाही)